पहिले मित्राला खेळायला बोलवायला
जायचो…
चल रे खेळायला अस म्हंटल्यावर
लगेच निघायचा,
ना खेळण्यासाठी वेळ होती,
ना होती जबाबदारी,
आवाज दिला की निघायचं
तिच आपली यारी होती
आत्ता मोठे झालो…
कॉल लावतो,massage करतो
पण तो मात्र एकच रिप्लाय देतो,
अरे आज वेळ नाहीये पुढल्या वेळी नक्की भेटतो,
Social Distance तर एक कारण होत
खरं तर आम्ही आधीच भेटणं सोडलं होत,
लहान होतो तेव्हा,
नव्हती कसली काळजी
नव्हती कसली जबाबदारी
ना होत कसलंही बंधन,
पण आत्ता मोठे झालोय
लावून घेतलंय स्वतः भोवती
करियर च कुंपण,
ना कोणी भेटतंय, ना कोणी आत्ता बोलतंय
कळत नाही मला सारं जग का बरं अस बदलतंय?
का?कसा?काय माहीत पण मित्र माझा हरवला
कदाचित,जबाबदारी च्या ओझ्याखाली दबला,
पण,माझा लहानपणाचा मित्र हरवला
माझा मित्र हरवला…
-विनय महाजन