मागच्या बाकावर बसणारा
आमचा मन्या,
आज आमदारकीला उभा राहिला
आणि समोरच्या बाकावर बसणारे आम्ही
जातो नऊ ते पाच राबायला
मागच्या बाकावर बसणारा
आमचा गण्या,
आज चार दुकानाचा मालक झाला
आणि समोरच्या बाकावर बसणारे आम्ही
जातोय दुसऱ्यांची स्वप्न पूर्ण करायला
मागच्या बाकावर बसणारा
आमचा पण्या,
आज आर्मी मध्ये ऑफिसर झाला
आणि समोरच्या बाकावर बसणारे आम्ही
रोज जातोय आमच्या साहेबाला सॅल्युट करायला
वाटायचं मागचा बाकावर बसणं घाण असत,
पण खरं तर तेथेच शिक्षण भेटत असत,
सोरच्या बाकावरून फक्त फळ्या कडे लक्ष असत,
आणि मागच्या बाकवरून सगळ्या वर्गाच चित्र दिसत,
पुस्तकातलं शिक्षण हे सोमरच्या बाकावर भेटत,
पण,आयुष्याचं शिक्षण तर मागच्याच बकावर असत,
म्हणतात शितावरून भाताची परिक्षा करता येते,
पण बाकवरून कोणच्या भविष्याची नाही करता येत,
आणि केलीच तर हेच कळेल की,
मागचा बाकच आयुष्यात पुढे नेतो….
-विनय महाजन