घरचा दौरा…

सहामाही परीक्षेसारखं सहा महिन्यातून एकदा घरी यायचं,

अन् गणिताचा पेपर विद्यार्थ्यांना छळतो तसं आईला छळायचंअगं

हे नाही गं ते कर खायला म्हणून गळा काढायचा,

अन् तिनं उत्साहानं काही केलं की आपण आदाशा सारखा ताव मारायचा

मेसचं जेवण खाऊन कंटाळलेल्या या देहाला आज तिच्या हातची कार्ल्याची भाजीपण गोड लागली,

हं…तुला त्या काकूसारखं जमतच नाही बा म्हणणाऱ्या माझ्या जिभेला खऱ्या अर्थानं आज तिच्या हातची चव कळली,

पण तुम्हाला सांगतो…

परक्या शहरात राहून पोटासाठी कमवतो, पण पोट काही भरत नाही

आणि आईच्या हातचं खाल्याशिवाय कोणाचाच आत्मा तृत्प होत नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *