कोणी तिकीट देता का तिकीट…

‘मोडेल पण वाकणार नाही’. हा इतिहास अभिमानानं सांगणारे मराठे आहोत आपण. पण इथं आपले निष्ठावंत कार्यकर्ते झुकले बी अन् वाकले बी.

३० डिसेंबर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. पण तो दिवस महाराष्ट्राच्या राजकारणातला वाईट दिवस म्हणावा, की सगळ्यात चांगला तेच मला समजत नाही आहे. तुम्ही म्हणाल वाईट दिवस का म्हणायचं? तर त्याचं कारण, पाच मिनिटात निष्ठा वेशीला टांगून, पुढच्या दहा मिनिटात दुसऱ्या पक्षात प्रवेश करून, अर्धा तासात तिकीट मिळवणारे लोकप्रतीनिधी आपण पाहिले. निष्ठावंत कार्यकर्त्याला तिकीट नाकारून आयारामांना तिकीट विकणारे नेते आपण पाहिले. साहेबांच्या वाढदिवसाला रक्तदान शिबीर ठेवणारे, माझं साहेबांवर आणि साहेबांचं माझ्यावर किती प्रेम आहे, ते वर्षभर बोंबलत सांगणाऱ्या कार्यकर्त्याला साहेबाच्या घराबाहेर तिकीट मिळवण्यासाठी रक्त आटवताना आपण पाहिलं. पण या सगळ्यात डळमळली ती महाराष्ट्राची राजकीय प्रतिमा, अन् जिंकला तो पैसा, हारली ती निष्ठा.

पण यात काही चांगलं ही झालं. जे पाच वर्षात जनतेनं करायला पाहिजे, ते पक्षांच्या कार्यकर्त्यांनी करून दाखवलं. ते म्हणजे, नेत्यांना जाब विचारणं. कार्यकर्त्यांनी आक्रोश केला. कार्यकर्त्यांनी हिशोब मागितला, कार्यकर्त्यांनी जाब विचारला आणि कार्यकर्त्यांनीच नेत्यांना घेराव घालून दाखवून दिली त्यांची जागा. फक्त हे सगळं करायलाना थोडा उशीर झाला. कार्यकर्त्यांनो हे तेव्हाच करायला पाहिजे होतं, जेव्हा तुमच्या नेत्यानं तुमच्या नाकावर टिच्चून, तुमच्या प्रतिप्रस्पर्ध्याला पक्षात स्थान दिलं. हे तेव्हा करायला पाहिजे होतं. जेव्हा तुम्ही जपलेल्या, तुम्ही वाढवलेल्या विचारधारेशी, तुमच्या नेत्यानं तडजोड केली आणि सत्तेसाठी नको त्यांच्याशी हातमिळवणी केली.

पण असो कार्यकर्त्यांनो जे केलंत ते चांगलं केलं. पण एक गोष्ट सांगतो. प्रसिद्ध लेखक अरविंद जगतापांनी त्याच्या सेल्फी या पुस्तकात कार्यकर्त्याविषयी लिहीलं होतं. “हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर ताटाची किंमत असते चमच्याची नसते आणि खाताना चमच्याला वाट असतं आपणच खातोय, पण खाणारी तोंड वेगळीच असतात हे चमच्याला कळतच नाही. त्यामुळे कोणाचे चमचे होऊन फिरण्या पेक्षा…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *