“समय से पहले कोई नहीं जायेगा”

ग तुमच्या हारण्याची वाट पाहत असताना जिंकण्यात मजा आहे. तुमच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं की स्वतःला सिद्ध करण्यात वेगळाच आनंद आहे.  रोहित शर्मा…१९ जुलैला लॉर्ड्स या ऐतिहासिक क्रिकेट मैदानावर त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार. रोहित ऑऊट फॉर्म आहे. पुढच्या वर्षी वनडे विश्वचषक आहे. नाही खेळणार रोहित शर्मा. सोशल मीडियावरच्या या बिनबुडाच्या चर्चा खऱ्या वाटायला लागल्याच होत्या, की हीट मॅननं १३८ धावांची जबराट खेळी खेळली. शतकही असं मारलं की नवा विक्रम आपल्या नावावर केला. 

रोहित पाठोपाठ विराटनंही खणखणीत अर्धशतक लगावलं. या दोघांची आजच्या सामन्यातली खेळी असो किंवा एकंदरीत इंग्लंड विरुद्धची मालिका यातून एकच चित्र स्पष्ट झालं. भारतीय संघाला अजूनही विराट आणि रोहितच्या अनुभवाची गरज आहे. आजकाल कॉर्पोरेटमध्ये एक पॅटर्न राबवलं जातं. ५० हजाराच्या पगाराचा एक माणूस कामावर ठेवण्यापेक्षा २५ हजार पगार असणारी दोन मुलं कामावर ठेवा. पण यात वजा होणारा २५ हजारांचा अनुभव खूप मोठं नुकसान करून जातो. अगदी तसंच सध्या तरी रोहित आणि विराटच्या अनुभवाची बदली नाही हे नक्की.

रोहित असो किंवा विराट असो एक दिवस प्रत्येक खेळाडूला निवृत्त व्हायचंच आहे. त्यांच्या चाहत्यांची इच्छा नसली तरी त्यांना जायचं आहे. पण पंचायत या वेब सिरीज मधलं छान वाक्य आहे. “समय से पहले कोई नहीं जायेगा”

आणि रोहित शर्माचा खेळ अजून खूप बाकी आहे. हे त्यानी आज दाखवून दिलं. त्यामुळे २०२४ च्या अश्रूंचा बदला घेतल्याशिवाय हीट मॅन ऐकत नसतो..हे मात्र नक्की.

– विनय महाजन

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *