
अचानक ठरलेले प्लॅन्स कधीपण भारीच असतात. मीडियामध्ये मित्र-मैत्रीणींचा वॉक ऑफ एकाच दिवशी येणं दुग्धशर्करा योगच म्हणावा लागतो. असाच काहीसा योग जुळून आल्यानं फिरायला जायचा प्लॅन ठरला खरा, पण चर्चगेटजनळ लागलेल्या पुस्तक प्रदर्शनाच आम्ही कसे पोहोचलो आम्हालाच कळालं नाही.
असो, शहरात आल्यापासून अनेक प्रदर्शनं पाहिली. नाण्यांचं प्रदर्शन, पत्रांचं प्रदर्शन, चित्रांचं,छायाचित्रांचं प्रदर्शन अशी अनेक. हे सगळं पाहिलं की असं वाटायचं ही असली प्रदर्शन आपल्या गावात कधीच लागली नाहीत. हेच काय गावात कधी तरी पुस्तक प्रदर्शन लागायचं. पण त्यातली पुस्तकं नेमके कुठली पुस्तक प्रेमी वाचायचे तेच मला अजून समजलेलं नाही.

मला स्वतःला पुस्तक प्रदर्शन पहायला आवडं. पुस्तक प्रदर्शनात फिरताना खजिना हातात लागावा तसं बरंच काही हाती लागतं. एखादं क्षेत्र, एखादा विषय आपल्याला महितीही नसतो आणि त्यावर बरंच काही लिहिलेलं आपल्या हाती लागतं. हे फार कमाल आहे. म्हणून अशा प्रदर्शनाला अधूनमधून भेटी दिल्या पाहिजे. आपल्या मराठीतच एवढा अफाट साहित्यसाठा आहे. प्रदर्शनातून तर इतर भाषेतला साहित्यसाठा पण आपल्यापर्यंत पोहोचतो. वरून डिस्काउंट वाली तो बातही अलग है, नाही का?

पण एक गोष्ट खरी आहे. शहरातील मुलांपेक्षा गावकडच्या मुलांचं अवांतर वाचन कमी असतं. आपण पाठ्यक्रमाबाहेरचं काही वाचावं अशी गरजच कधी त्यांना निर्माण झालेली नसते. महाराष्ट्रातील ग्रामीण भागानं अनेक चांगले लेखक दिले. ग्रामीण भागावर, तिकडच्या परिस्थितीवर खूप काही चांगलं लिहिलं गेलं आहे. ग्रामीण भागातून आलेल्या अनेत व्यक्तीमत्वांचं आत्मचरित्र वाचण्यासारखे आहेत. अशीच ग्रामीण भागातल्या दोन व्यक्तींची आत्मचरित्र याप्रदर्शनातून माझ्या हाती लागली. त्यामुळे अशी चांगल्या पुस्तकांची प्रदर्शन ग्रामीण भागातही लागलायला हवी. म्हणजे राजकीय नेत्यांच्या बॅनर पलीकडे वाचण्याची संस्कृती तिकडेही रुजू होईल. बाकी अशा प्रदर्शनावरही एखादं पुस्तक यावं, कारण प्रदर्शनांची भूमिका समाजात महत्वाची आहे.