बाप्पा,मंडळ आणि ते १० दिवस…
काल गावातल्या मित्राचा कॉल आला. त्याला म्हंटलं कशी चालू आहे गावात गणपतीची तयारी? तो कॉलवर बोलत होता, पण माझं मन सगळं लहानपणीच्या आठवणीत गुंतलं होतं. चौथीत असताना चार मित्रांनी मिळून गणपती मांडायला सुरुवात केली होती. घरासमोरच्या वरांड्यातच, फार मोठा मंडप नाही. वर्गणी दिली तितकीच घ्यायची आणि ठरलेल्या बजेटमध्ये सगळं गणित बसवायचं. मोठा प्रसाद नाही, डीजेवैगरे […]