Blog

Tavalkhor-Vinay

Blog Posts

Ready to see the world through my lens .

शिवसेना आणि आंदोलनाचा इतिहास

१९६६ मराठी माणसाला स्वाभिमानानं जगायला शिकायला लावणारं वर्ष, कारण यावर्षीच स्थापना झाली, बाळासाबेबांच्या शिवसेनेची. बाळासाहेबांची शिवसेना फक्त यासाठी म्हणतोय कारण आताची शिवसेना आणि तेव्हाची यात जमीन आस्मानाचा फरक आहे. बाळासाहेब असताना शिवसेनेनं अनेक आंदोलनं केली. ती सगळी आंदोलनं आर या पारची होती. १. स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगारासाठीचं आंदोलन (१९६६ नंतर) २. महागाईविरोधी विशाल आंदोलन (१९७३) ३. […]

नाना आम्हाला तुमच्या सारखं जगायचं…

नाना, आजोबांना नाना म्हटलं जातं. आणि नाना माझ्या आजोबांच्या वयाचे, ज्यांनी माझ्या वडिलांच्या आणि माझ्या पिढीलाही तेवढंच प्रेम दिलं. नाना तुम्हाला कधी भेटलो नाही. पण पत्रकारितेत आल्यापासून तुम्हाला भेटणाऱ्या अनेकांकडून तुमच्याबद्दल भरभरून ऐकलं. नाना तुमचे अनेक चित्रपट पाहिले. एक ‘नट’ म्हणून तुम्ही ‘सम्राट’ होताच, पण माणूस म्हणून तुम्ही चक्रवर्ती सम्राट होता. आणि म्हणूनच नाना, आम्हाला […]

बापटांची चापट!

पुणे विद्येचं माहेर घर, असं म्हणतात पुण्यानं देशाला दिशा दाखवली. अहो एवढंच काय, काही दिवसांवर येऊन ठेपलेला गणेशोत्सव, त्याला सार्वजनिक स्वरुप देण्यातही एका पुणेकराचाच हातभार. पण यावर्षी ना बाप्पा येण्याआधीच पुण्याचा गणेशोत्सव चर्चेत आला आहे. गणेशोत्सवावरून दोन गट निर्माण झाले आहे. त्याचं झालं असं, वरील फोटोत दिसणारे गृहस्थ आहेत विद्यानंद बापट. ते स्वतःला हाडाचे नास्तिक […]

प्रिय मुख्यमंत्री महोदय,

मी तुमच्या राज्यातील एक मराठी तरुण बोलतोय.नाही आम्हाला सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार कधीच हिरावून घेण्यात आलाय. हे लक्षात आलंय माझ्या, नाही तर उगाच का? विद्यार्थ्यांची व्यथा मांडणाऱ्या पत्रकार मंदार गोंजारींवर पुण्यात गुन्हा दाखल झाला. असो, म्हणून प्रश्न न विचारता भावना व्यक्त करीन म्हणतोय. मुख्यमंंत्री महोदय या मराठीनं तुम्हाला एक साधा नगरसेवक ते मुख्यमंत्री केलंय. ही […]

प्रदर्शनाचं पुस्तक…

अचानक ठरलेले प्लॅन्स कधीपण भारीच असतात. मीडियामध्ये मित्र-मैत्रीणींचा वॉक ऑफ एकाच दिवशी येणं दुग्धशर्करा योगच म्हणावा लागतो. असाच काहीसा योग जुळून आल्यानं फिरायला जायचा प्लॅन ठरला खरा, पण चर्चगेटजनळ लागलेल्या पुस्तक प्रदर्शनाच आम्ही कसे पोहोचलो आम्हालाच कळालं नाही. असो, शहरात आल्यापासून अनेक प्रदर्शनं पाहिली. नाण्यांचं प्रदर्शन, पत्रांचं प्रदर्शन, चित्रांचं,छायाचित्रांचं प्रदर्शन अशी अनेक. हे सगळं पाहिलं […]

डी-मार्ट, इज नॉट गुड फॉर माय हार्ट!!!

चार ते पाच आदिमानव सोबत राहत असतात. मिळले ते खातात, वाटेल तसं जगतात कोणी अडवणारं नसतं, ना कोणी विचारणारं नाही. मग एक दिवस त्यांना आठवतं, आपल्याला मिळणारा आहार हा योग्य नसून तुकाराम मुंढे साहेबांचा तिसरा डोळा उघडणारा आहे. म्हणून हे आदिमानव स्वतःचा आहार स्वतः  तयार करायचं ठरवतात. मग आगीचा शोध लावण्यापासून तयारी सुरू होते. कारण […]

गूँगी गुडियानं बोलतं व्हावं…

काँग्रेसनं राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना “गूँगी गुडिया” म्हणून संबोधलं. अन् राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या ते म्हणाला लागलं. मग सुरू झाली शहराशहरात आंदोलनं, घोषणाबाजी आणि माफिनाम्याची मागणी. अजितदादांना जाऊन सहा महिनेच झाले, सुनेत्रावहिनींना सक्रिय राजकारणात उतरून अवघे काही महिने झाले मग काँग्रेस अशी टीका करूच कसकाय शकतं असा राग देखील अनेकांनी व्यक्त केला आहे. पण राग याचा यायला […]

माझी भाषा, माझा अभिमान

“लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी.”  सुरेश भटांच्या या ओळी वाचल्या की आपली भाषा मराठी आहे. आपण मराठी बोलतो, आपण मराठी जगतो हे आठवून वेगळीच श्रीमंती येते. एक भाषा तिच्या वऱ्हाडी, अहिराणी, मालवणी आणि अशा कितीतरी उपभाषा, केवढा समृद्ध वारसा आहे आपला. पण जेवढी घरात संपत्ती तेवढा मुलांमध्ये वाद अधिक, असं असतच. […]

सरकारला वाचनवेड संपवायचं आहे का?

समजायला लागलं तेव्हापासून घरात नियमित वृत्तपत्र यायचा. बाबा, दादा न चुकता वृत्तपत्र चाळायचे, सगळ्यांचं वाचून झालं, की मग दुपारी सगळी कामं झाल्यावर आई ते वृत्तपत्र हातात घेणार आणि मुख्य पान, संपादकीय पान आणि राजकारणाला फाट्यावर मारून थेट शब्दकोडं सोडवायला घ्यायची. त्यानंतर भाजी निवडायला ती वृत्तपत्राचा वापर करणार, डब्यांच्या रॅकमध्ये टाकायला वृत्तपत्राचा वापर होणार. एवढंच काय […]

सीजेपी, पंजाब, जेन झी आणि भाजप

कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानं देशातील राजकारणाला एक नवं वळण मिळालं आहे. १२ वर्षांच्या मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये भ्रष्टाचाराचे अनेक आरोप होऊन देखील एकाही मंत्र्यांचा राजीनामा घेता न येणं, हा विरोधकांचा एक प्रकारे पराजयच होता. मात्र आता सीजेपीच्या जंतर मंतरवरील आंदोलनानं विरोधकांच्या या पराजयावर पांघरून घालण्यात यश आल्याचं म्हणावं लागेल. पण आता प्रश्न एवढ्यावरच थांबणारा नाही आहे.  […]