Blog

Tavalkhor-Vinay

Blog Posts

Ready to see the world through my lens .

माझी डायरी

व्यक्त व्हायलाचं हवं लहान असताना मला एक गोड सवय होती, शाळेतून आल्यावर नाहीतर, रात्री जेवतांना आज दिवसभरात कायकाय झालं याचा पाढा वाचून दाखवण्याची. पण जसं-जसं मोठा होत गेलो, शाळा ही सुटत गेली आणी त्याच सोबत ती सवय ही, पण आवश्यक असतं असं कुठे तरी, कोणा जवळ व्यक्त होता येणं. पण आज कोणाकडे सुख-दुखः समजुन घ्यायला […]

दशावतार!

माझा जन्म विदर्भातला, माझं गाव तर अगदी विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवरच. लहानपणी मी निसर्ग म्हणजे सुकलेली झाडं आणि वाळलेली पिकं या पलीकडे काही पाहिला नाही. आठदिवसा आड पिण्यासाठी मिळणारं पाणी, आटलेले तलाव आणि विहीरी यापलीकडे फार काही पाहिलं नाही. विदर्भ, मराठवाड्यात डोंगरदऱ्या, निसर्ग नाही अशातला भाग नाही. पण जो निसर्ग कोकणाला लाभलाय, ज्या प्रकारे तो तिथल्या […]

बाप्पा,मंडळ आणि ते १० दिवस…

काल गावातल्या मित्राचा कॉल आला. त्याला म्हंटलं कशी चालू आहे गावात गणपतीची तयारी? तो कॉलवर बोलत होता, पण माझं मन सगळं लहानपणीच्या आठवणीत गुंतलं होतं. चौथीत असताना चार मित्रांनी मिळून गणपती मांडायला सुरुवात केली होती. घरासमोरच्या वरांड्यातच, फार मोठा मंडप नाही. वर्गणी दिली तितकीच घ्यायची आणि ठरलेल्या बजेटमध्ये सगळं गणित बसवायचं. मोठा प्रसाद नाही, डीजेवैगरे […]

पोळा…

हिंदू सणांपैकी एक लुप्त होत असलेला सण…म्हणजे बैलपोळा. शहरात सगळ्या सणांचे इव्हेंट झाले. देशभरातून अनेक लोक, ब्लॉगर दहीहंडी, गणेशोत्सवाचे सण नव्हे तर इव्हेंट पहायला मुंबई, पुण्यासारख्या शहरात येतात. पण पोळा या सणाचा इव्हेंट होऊ शकला नाही. का? कारण हा सण शेतकऱ्यांचा आहे. हा सण बैलांचा आहे. हा सण त्या लोकांचा आहे. जे लोक जगले काय […]

घरचा दौरा…

सहामाही परीक्षेसारखं सहा महिन्यातून एकदा घरी यायचं, अन् गणिताचा पेपर विद्यार्थ्यांना छळतो तसं आईला छळायचंअगं हे नाही गं ते कर खायला म्हणून गळा काढायचा, अन् तिनं उत्साहानं काही केलं की आपण आदाशा सारखा ताव मारायचा मेसचं जेवण खाऊन कंटाळलेल्या या देहाला आज तिच्या हातची कार्ल्याची भाजीपण गोड लागली, हं…तुला त्या काकूसारखं जमतच नाही बा म्हणणाऱ्या […]

स्वातंत्र्यदिन…

आज स्वातंत्र्यदिन, कधीकधी वाटतं यार उगाच मोठे झालो ना. कारण स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लहानपणीचा उत्साह कमाल असयचा. म्हणजे मला तर १५ ऑगस्टपेक्षाही….१४ ऑगस्टची फार गंमत वाटायची. ये भाई पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन असतो म्हणून नाही काही….तर आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या तयारी करण्याची मजाच वेगळी होती म्हणून. १४ ऑगस्टला आमच्या शाळेत गणवेश नसला तरी चालायचा, मग रंगबिरंगी कपड्यातली सगळी मुलं […]

सारसबाग…

मुंबई-पुणे-मुंबई चित्रपट पाहिल्यानंतर ना पुण्यात कधी न आलेला पण पुण्याच्या प्रेमात पडतो. म्हणजे माझं असंच झालं. १२ वी नंतर जवळपास सगळे मित्र पुण्यातच गेली. त्यांच्याकडून पुण्याचे किस्से ऐकायल्यानंतर वाटायचं, यार आपल्याला पण जाता आलं असतं तर, पण म्हणतात ना, प्रत्येक गोष्ट तुम्हाला याेग्य वेळा आली की मिळत असते. अगदी तसंच मला पदवीनंतर पुण्यात शिकण्याची संधी […]

ती समर्थ आहे, स्वरक्षणाला…

तिची कमाल आहे. भांड्यावर फिरवणारे हात, ती किबोर्डवर फिरवायला लागली आणि जग प्रगतीच्या वाटेवर घेऊन गेली. घरातलं आर्थिक नियोजन करणारी आई आणि देशाची तिजोरी सांभाळणारी निर्मला ताई पाहिली, की वाटतं तिची कमाल आहे. पाकिस्तानला सडेतोड उत्तर देणाऱ्या सोफिया आणि व्योमिका ताईला पाहिलं की वाटतं , तिची कमाल आहे. छोटं बाळ उराशी बांधून शेत निंदायला जाणारी […]